अँटिलिया हे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित असलेले $१.६ अब्ज किमतीचे खाजगी निवासस्थान आहे. हे नाव १५ व्या शतकातील स्पॅनिश कथांमधील एका बेटाच्या नावावरून देण्यात आले आहे. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान आहे.
८ रिश्टर स्केलचा भूकंप ही इमारत सहन करू शकते.वरचे सहा मजले खाजगी निवासी क्षेत्र आहेत. संरचनेच्या रचनेत कमळाचे रोप आणि सूर्य यांचा समावेश आहे. ही इमारत २७ मजली असून याची उंची १७३ मीटर (५६८ फूट) उंच, ६,०७० चौरस मीटर (६५,३४० चौ. फूट) इतकी आहे. यामध्ये १६८- कार गॅरेज, बॉलरूम, ९ हाय-स्पीड लिफ्ट्स, ५० आसनांचे थिएटर, टेरेस गार्डन्स, स्विमिंग पूल, स्पा, हेल्थ सेंटर, एक मंदिर यासारख्या सुविधा आहेत.
या इमारतीचे २०२३ मधील मूल्य $४.६ अब्ज इतके आहे.
अँटीलिआ (इमारत)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.