अदिती पंत एक भारतीय समुद्रशास्त्रज्ञ आहेत . १९८३ मध्ये भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भूवैज्ञानिक सुदीप्त सेनगुप्ता यांच्यासमवेत अंटार्क्टिकाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. यावेळी महिलांना सन्मान्य शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. डॉ.अनिता पंत यांनी या अडथळ्यांवर मात केली आणि सर्व इच्छुक महिला वैज्ञानिकांसाठी एक आदर्श बनल्या आहेत. त्यांनी हे दाखवून दिले आहे की महिला केवळ अंतराळापर्यंतच पोहोचू शकत नाहीत, तर पृथ्वीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंतसुद्धा पोहोचू शकतात (म्हणजे अंटार्क्टिका प्रदेश). नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदिती पंत
यामागील विज्ञान आणि इतिहास.