अतुल मोरेश्वर सावे म्हणजे अत्यंत प्रभावशाली, कर्तव्यदक्ष आणि सक्षम नेतृत्व.
संभाजीनगर (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार. तसेच माजी खासदार श्री. मोरेश्वर सावे यांचे ते सुपुत्र असून तीर्थरूपांचा समाजकारण आणि विकासाचा लाभलेला वारसा ते अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत.
त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे 2014 ते 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 2018 मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद (उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य) तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले.
जनतेच्या कल्याणासाठी आपल्या पदाचा खंबीरपणे उपयोग करून घेत त्यांनी सुमारे २००० कोटींहून अधिकचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आणि म्हणूनच केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक नेतृत्व म्हणून अतुल सावे पुढे येत आहेत.
सध्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
अतुल सावे
थोडक्यात पण महत्त्वाचे.