अण्णा विद्यापीठ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अण्णा विद्यापीठ

अण्णा विद्यापीठ (तमिळ: அண்ணா ப‌ல்கலைக்கழகம்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. चेन्नईच्या गिंडी भागात प्रमुख कॅम्पस असलेले अण्णा विद्यापीठ १९७८ साली मद्रास विद्यापीठामधील ४ कॉलेजांचे एकत्रीकरण करून निर्माण करण्यात आले. ह्या विद्यापीठाला तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई ह्यांचे नाव दिले गेले आहे. अण्णा विद्यापीठाचे चेन्नई व्यतिरिक्त मदुराई, तिरुचिरापल्ली, कोइंबतूर व तिरुनेलवेल्ली येथे देखील कॅम्पस आहेत.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास व गिंडी राष्ट्रीय उद्यान अण्णा दिव्यापीठापासून जवळच स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →