अजिंक्य रहाणे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य मधुकर रहाणे ( ६ जून, इ.स. १९८८) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो भारतीय क्रिकेट संघामध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.

इ.स. २००७-०८ हंगामामध्ये रहाणेने प्रथम श्रेणीतील स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. प्रथम श्रेणीतील १०० डाव खेळला तेव्हा त्याच्या धावांची सरासरी ६२.०४ होती. रहाणेने पहिल्या ५ हंगामांमध्ये तीन वेळा १००० पेक्षा अधिक धावा केल्या. ऑगस्ट इ.स. २०११ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध भारताकडून मॅंचेस्टर येथे टी२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळून पदार्पण केले. मार्च इ.स. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील सामन्याद्वारे रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले . न्यू झीलंडमधील बेसिन रिजर्व, वेलिंग्टन येथे त्याने पहिले कसोटी शतक झळकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →