अजय पिरामल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अजय पिरामल

अजय पिरामल(जन्म ३ ऑगस्ट १९५५) हे भारतातील आघाडीचे उद्योगपती व पिरामल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अजय पिरामल यांची कंपनी पिरामल एंटरप्राइजेज फार्मा, हेल्थकेयर, रिअल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्विसेस, ग्लास पॅकेजिंग आणि फायनान्स सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. पिरामल ग्रुप भारताव्यतिरिक्त, अमेरिका, ब्रिटन, युरोप, जपान, आशिया आणि दक्षिण आशियासह ३० पेक्षा जास्त देशांमध्ये आपला व्यवसाय करत आहे. ह्या कंपनीची उत्पादने जगातल्या १०० पेक्षा जास्त मार्केट मध्ये विकली जातात. पिरामल एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल गेल्या सात वर्षांमध्ये चार पटींनी वाढले आहे, २०१०-११ मध्ये ते सरासरी १०,००० कोटींवरून ते एप्रिल २०१८ मध्ये ४५,००० कोटी रु. इतके झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →