अग्निपरीक्षा ही हिंदू पुराणातील एक चाचणी होती ज्यामध्ये अग्निदेवतेचे मंत्रांचा वापर करून पुजारीद्वारे आवाहन केले जात असे. प्राचीन भारतात वापरली जाणारी ही चाचणी अग्निपरीक्षा म्हणून ओळखली जात होती. आवाहन केल्यानंतर, एक चिता बांधली जात असे आणि पेटवली जात असे. त्यानंतर आरोपीला त्यावर बसण्यास सांगितले जात असे. हिंदू पौराणिक कथेनुसार, आरोपी निर्दोष असल्यास अग्निदेव त्यांचे रक्षण करेल, नाही तर आरोपी जाळून राख होईल.
अग्निपरीक्षेचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण सीतेचे आहे. रामायणातील प्रमुख नायिका असलेल्या सीतेला तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तिचा पती रामाने अग्निपरीक्षा द्यायला लावली होती.
अग्निपरीक्षा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.