मंदोदरी ही लंकेचा राजा असलेल्या रावणाची पत्नी होती. हिंदू महाकाव्य रामायणात तिचा उल्लेख आढळतो. रामायण हे मंदोदरीचे वर्णन सुंदर, धार्मिक आणि नीतिमान स्त्री असे करते. पंचकन्यांपैकी एक म्हणून तिचा गौरव केला जातो, ज्यांच्या नावाचे पठण केल्याने पाप दूर होते असे मानले जाते.
मंदोदरी ही असुरांचा राजा मायासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या होती. मंदोदरीला तीन मुले आहेत: मेघनाद (इंद्रजित), अतिकाया आणि अक्षयकुमार. काही रामायण रूपांतरानुसार, मंदोदरी ही सीतेची आई देखील आहे, जिचे रावणाने अपहरण केले होते. तिच्या पतीच्या चुका असूनही, मंदोदरी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याला धार्मिकतेच्या मार्गावर जाण्याचा सल्ला देत असते. मंदोदरी वारंवार रावणाला सीतेला रामाकडे परत करण्याचा सल्ला देते, परंतु तिचा सल्ला तो नेहमी दुर्लक्ष करतो. तिच्या रावणावरील प्रेम आणि निष्ठेची रामायणात प्रशंसा केली आहे.
रामायणाच्या एका आवृत्तीत, हनुमान तिला एका जादुई बाणाचे स्थान उघड करण्यासाठी फसवतो, जो राम रावणाचा वध करण्यासाठी वापरतो. रामायणाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये असे म्हणले आहे की, रावणाच्या मृत्यूनंतर, विभीषण - रावणाचा धाकटा भाऊ जो रामाच्या सैन्यात सामील होतो आणि रावणाच्या मृत्यूला जबाबदार असतो - तो रामाच्या सल्ल्यानुसार मंदोदरीशी लग्न करतो.
मंदोदरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.