अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता. अक्षतांचे अनेक उपयोग धर्मकार्यात सांगितले आहेत. यांचा रंग हळद कुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.'क्षत' हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ म्हणजे हानी, व्रण, छिद्र / भोक. अ+क्षत असा 'अक्षत' हा शब्द बनला आहे. ज्याला भोक नाही असा अखंड तांदूळ हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अक्षता
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?