ही भारतातील अरुणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात आहे. ३१० चौ.किमी. टापूत अदमासे २,००० अका लोक राहतात. त्यांची २१ खेडी आहेत व प्रत्येक खेड्यात ५० ते ६० लोक राहतात. हा सर्व प्रदेश जंगल, पर्वत व लहान लहान जलप्रवाहांनी व्यापलेला आहे. प्रामुख्याने बांबूची जंगले आहेत. अका स्वतःस ऱ्हूसो म्हणवतात. इतर लोक त्यांना ‘अका’म्हणतात. गौर वर्ण, चपटे नाक, वर आलेली गालाची हाडे, काळे केस, पिंगट किंवा निळे डोळे, मध्यम उंची ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये आहेत. अका बोली तिबेटो-ब्रह्मी भाषापरिवारातील आहे.
अका स्थलांतरित शेती करतात. मुख्य पिके मका, उडीद व रताळी आहेत. सामाजिक, धार्मिक कार्यात डुकराचे, बोकडाचे किंवा मिथानचे मांस खातात. स्त्रियांना कोंबडी व मिथानचा मेंदू आणि पाय वर्ज्य आहेत, तसेच दूध व दुधाचे पदार्थही निषिद्ध आहेत. वर्ज्य पदार्थ खाल्ल्यास चेहरा विद्रूप होतो, असा त्यांचा समज आहे. अका बांबूची घरे बांधतात. घरे खांबावर अधांतरी बांधलेली असतात. घरात पाहुण्यांकरिता ‘थुमोना’ नावाची खोली असते.
अका जमात
थोडक्यात पण महत्त्वाचे.