अंजनी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. अंजनी रिसरवियर येथून नदीचा उगम आहे. या नदीवर अंजनी धरण बांधण्यात आले आहे, जेथून नदीला वर्षाच्या बऱ्याच वेळी पाणी मिळत असे. अंजनी नदीसोबत वाहणारी नदी झिरी अंजनी पेक्षा रुंदीत आणि पाण्याच्या प्रवाहात खूप मोठी आहे. या नदीवर शासनातर्फे नदीजोडणी प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. या जिल्ह्यातील गिरणा नदीवर असलेल्या गिरणा जलाशयातून, जामदा डाव्या कालव्यामार्फत पाणी या नदीत सोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यायोगे या परिसरात पडणारे पावसाचे पाणीही वाहून जाणार नाही व त्याचा योग्य वापर करता येईल. हा जोडणी प्रकल्प सुमारे १२७ किमी लांबीचा आहे. जळगाव जिल्ह्यातील नद्याजोडणी प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नदी सोबत नदीणारी झिरी नदी रुंदीत आणि पाण्याच्या प्रवाहात मोठी होत चालली आहे. या नदीच्या मोठ्या पुरात ५७८ घन मी एवढा प्रवाह होता त्या व्यतिरिक्त अंजनी नदीचा प्रवाह फक्त ४०९ घन मी एवढा होता.
सोनवद या नदीच्या काठी वसलेले एक मोठी गाव आहे त्या व्यतिरिक्त पिंपरी खुर्द हे देखील एक सर्वात मोठे गाव आहे जे या नदीच्या काठी वसलेले आहे. झिरी नदीच्या काठी वसलेल्या मोठ्या गावांमध्ये झुरखेडा आणि पिंपळकोठा या गावांचा समावेश आहे.
अंजनी नदी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.