अँटनी अँड क्लियोपात्रा ही विल्यम शेक्सपियरची शोकांतिका आहे. हे नाटक प्रथम १६०७ च्या सुमारास किंग्स मेन गटाद्वारे ब्लॅकफ्रीअर्स थिएटर किंवा ग्लोब थिएटरमध्ये सादर केले गेले. द ट्रॅजेडी ऑफ अँटनी अँड क्लियोपात्रा या शीर्षकाखाली १६२३ मध्ये प्रकाशित झालेल्या फर्स्ट फोलिओमध्ये त्याचे पहिले स्वरूप छापण्यात आले होते. क्लिओपात्रा ही इजिप्तच्या टॉलेमिक राज्याची शेवटची राणी होती. मार्क अँटनी (मार्कस अँटोनियस) हा एक रोमन साम्राज्यातील राजकारणी आणि सेनापती होता.
दुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आणि क्लियोपात्रा व मार्क अँटोनी यांच्यातील संबंधांना अनुसरून आहे जे सिसिलियन बंडापासून ते क्लिओपात्राच्या आत्महत्येपर्यंत आहे.
नाटकातील मुख्य खलनायक हा ऑक्टाव्हियस सीझर आहे, जो अँटोनीचा दुसरा ट्रायम्विरेटचा सहकारी आणि रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता. शोकांतिका मुख्यत्वे रोमन प्रजासत्ताक आणि टॉलेमिक इजिप्तमध्ये वसली आहे. ह्या वेगळ्या भौगोलिक स्थानांमुळे नाटकाच्या भाषिक नोंदणीमध्ये जलद बदल देसतात ज्यात ह्या जागांचे वैशिष्ट आहे जसे की कामुक व काल्पनिक अलेक्झांड्रिया आहे आणि अधिक व्यावहारिक, कठोर असे रोम आहे.
शेक्सपियरयांची क्लियोपात्रा ही नाटककाराच्या कार्यातील सर्वात जटिल आणि पूर्ण विकसित स्त्री पात्रांपैकी एक मानली जाते.ती बऱ्याचदा व्यर्थ आणि नाटकी आहे ज्यामुळे प्रेक्षकांना जवळजवळ तिचा तिरस्कार वाटतो. सोबतच शेक्सपियरने तिला आणि अँटोनीला विशाल दुःखद शेवटात गुंतवले आहे. या विरोधाभासी वैशिष्ट्यांमुळे समिक्षकांचे विभाजित प्रतिसाद मिळाले आहेत.
अँटनी आणि क्लियोपात्रा हे एकाच शैलीतील आहेत असे वर्गीकरण करणे कठीण आहे. याचे वर्णन इतिहासाचे नाटक (जरी ते ऐतिहासिक लेखानुरूप पूर्णपणे पालन करत नाही), शोकांतिका म्हणून (जरी पूर्णपणे ॲरिस्टॉटलच्या व्याख्येनुसार नाही), विनोदी किंवा प्रणय म्हणून नाही आणि काही समीक्षकांच्या मते हे एक समस्या नाटक आहे. हे शेक्सपियरच्या दुस-या शोकांतिका, ज्युलियस सीझरचा सिक्वेल आहे.
अँटनी अँड क्लिओपात्रा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?