ज्युलियस सीझर (नाटक)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ज्युलियस सीझर (नाटक)

द ट्रॅजेडी ऑफ ज्युलियस सीझर (प्रथम फोलिओतील शीर्षक: द ट्रॅजेडी ऑफ इव्हलिव्हस सीझर ), ज्याला ज्युलियस सीझर असे संक्षेपित केले जाते, हे विल्यम शेक्सपियरने १५९९ मध्ये प्रथम सादर केलेले एतिहासीक नाटक आणि शोकांतिका आहे.

नाटकात, ब्रुटस हा कॅसियसच्या नेतृत्वाखालील कटात सामील होतो जेज्युलियस सीझरची हत्या करण्यासाठी आहे ज्याने त्याच्या जुलमी साम्राज्याचा अंत होइल. सीझरच्या खास माणूस अँटनी हा सीझरच्या विरुधकांसोबत शत्रुत्व निर्माण करतो आणि पुर्ण रोम नाट्यमय गृहयुद्धात अडकते. मुळात हे राजकीय नाटक आहे. त्यात स्त्री पात्रांना फारसे महत्त्व नाही, पण तरीही अनेक पात्रांसह हे एक आकर्षक नाटक रचले आहे. यामध्ये राज्य, जनता आणि स्वातंत्र्याच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.

दुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आधारीत आहे. नाटकीय हेतूंसाठी, शेक्सपियरने प्लुटार्कच्या कथांपेक्षा नाटकात बदल करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. नाटकाचे पाच अंक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →