ॲल्युमिनियम ख्रिसमस ट्री/नाताळ वृक्ष हा कृत्रिम ख्रिसमस ट्रीचा एक प्रकार आहे जो १९५८ पासून १९६० पर्यंत अमेरिकेत लोकप्रिय होता. जसे त्याचे नाव सुचविते तसे हा वृक्ष ॲल्युमिनियमपासून बनवला जात असे, त्याला चमकीच्या कागदाची सजावट आणि फिरत्या रंगीत चक्राने प्रकाशित केले जात असे. ॲल्युमिनियमचा नाताळ वृक्ष नाताळच्या व्यापारीकरणाचे प्रतीक म्हणून १९६५ मध्ये दूरदर्शन विशेष, ए चार्ली ब्राउन ख्रिसमस या मालीकेत दाखवला गेला होता. तेव्हापासून सुट्टीत करायची सजावट म्हणून असलेल्या त्याच्या व्यवहारापेक्षा जास्त महत्त्व त्याला मिळवून दिले, २००० च्या दशकाच्या मध्यात ॲल्युमिनियमच्या झाडांना इंटरनेटवर विकले जाण्यास सुरुवात झाली, आणि खूप जास्त फायद्यात मोठ्या किंमतींना हे वृक्ष विकले जाऊ लागले. तेव्हापासून संग्रहालयाच्या संग्रहामध्ये देखील हे वृक्ष दिसू लागले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲल्युमिनियमचा नाताळ वृक्ष
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.