ॲनेट कॅरोल बेनिंग (२९ मे, १९५८:टोपेका, कॅन्सस, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. हीने रंगमंचावर आणि चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आहेत. चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत बेनिंगला बाफ्टा पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार तसेच एमी पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार मिळाले आहेत तसेच चार अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनेही मिळाली आहेत.
बेनिंगने १९८०मध्ये कॉलोराडो शेक्सपियर फेस्टिव्हल कंपनीतून रंगमंचावर कारकिर्दीची सुरुवात केली
बेनिंगला द ग्रिफ्टर्स (१९९०), अमेरिकन ब्युटी (१९९९), बिईंग जुलिया (२००४), आणि द किड्स आर ऑल राईट (२०१०) चित्रपटांतील भूमिकांसाठी चार अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली. याशिवाय तिने पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज (१९९०), बग्सी (१९९१), रिचर्ड III (१९९५), द अमेरिकन प्रेसिडेंट (१९९५) सह अनेक चित्रपटांतून काम केले आहे.
ॲनेट बेनिंग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?