ॲगाथा क्रिस्टी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ॲगाथा क्रिस्टी

ॲगाथा मेरी क्लॅरिसा, लेडी मॅलोवान, तथा अगाथा ख्रिस्ती (जन्म : टॉर्की (इंग्लंड), १५ सप्टेंबर १८९०; - चोल्सी (इंग्लंड), १२ जानेवारी १९७६ ही इंग्लिश भाषेत लिखाण करणारी लेखिका होती.

ॲगाथा ख्रिस्तीने मेरी वेस्टमॅकॉट नावानेही लेखन केलेले आहे, परंतु तिने लिहीलेल्या हरक्युल पॉयरॉ व मिस मार्पल या काल्पनिक सत्यान्वेषी नायक/मदतनीस मध्यवर्ती असलेल्या रहस्यकथां कथांनी तिला क्वीन ऑफ क्राईम अशी पदवी मिळवून दिली. तिने नंतरच्या अनेक रहस्यकथा लेखकांना प्रभावित केले.

ॲगाथा ख्रिस्तीच्या अनेक कादंबऱ्या मधुकर तोरडमल आणि रेखा देशपांडे यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. या कादंबऱ्या एकूण पाच संचांत आहेत. त्याशिवाय,

अनिल गुजर यांनीही ॲगाथा ख्रिस्तीच्या एका कादंबरीचा 'थोडक्यात चुकलं' या नावाचा अनुवाद केला आहे..

अगाथाच्या 'हिकरी डिकरी डॉक' या पुस्तकाचा अनुवाद मंजिरी जोशी हिने केला आहे.

सविता दामले हिने अगाथा ख्रिस्तीच्या 'द क्रुकेड हाऊस' या कादंबरीचा अनुवाद केला आहे.

अपर्णा भावे हिने 'मृत्युचं सावट' लिहिली आहे (मूळ कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →