२२ जून १८९७ (चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

२२ जून १८९७ हा एक इ.स. १९७९ मधील मराठी चित्रपट आहे. याची कथा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन यांनी लिहिली असून जयू पटवर्धन आणि नचिकेत पटवर्धन या पती-पत्नीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट चाफेकर बंधू द्वारे ब्रिटिश सरकारी अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड आणि 'चार्ल्स एगर्टन आयर्स्ट' यांच्या हत्येच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटाचा समावेश 'वन हंड्रेड इंडियन फीचर फिल्म्स: एन एनोटेड फिल्मोग्राफी' या पुस्तकात करण्यात आला आहे, जो पहिल्या भारतीय टॉकीजपासून ते तत्कालीन (१९८८) पर्यंतची प्रातिनिधीक निवड आहे. या चित्रपटाचे शीर्षक २२ जून १८९७ ही ब्रिटिश अधिकारी रँडच्या हत्येची तारीख आहे.

या चित्रपटाने इ.स. १९८० मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील 'रौप्य कमळ पुरस्कार' जिंकला होता. हा पुरस्कार दोन श्रेणींमध्ये म्हणजे, 'राष्ट्रीय एकात्मता' आणि 'कला दिग्दर्शनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट' यात मिळाला होता. या चित्रपटाने 'वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट' आणि 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी' १९८०चा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील जिंकला होता. 'यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेस'मध्ये भारतीय चित्रपट आणि व्हिडिओंच्या निवडक संग्रहात या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटातील बहुतेक कलाकार हे पुण्यातील थिएटर अकादमीचे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →