२०२६ उत्तर अमेरिका चषक ही उत्तर अमेरिका चषक क्रिकेट स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. ही क्रिकेट स्पर्धा २० ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत केमन द्वीपसमूह येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी२० (टी२०आ) दर्जा होता आणि यामध्ये यजमान केमन द्वीपसमूह, बहामास आणि बर्म्युडा हे तीन संघ सहभागी झाले होते. मुसळधार पावसामुळे पहिले दोन सामने रद्द झाले आणि त्यानंतर वेळापत्रकात बदल करण्यात आला; त्यामुळे स्पर्धेतील पहिला सामना २३ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला.
अंतिम सामन्यात बर्म्युडाने केमन द्वीपसमूहाचा ४२ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
२०२६ उत्तर अमेरिका चषक
थोडक्यात पण महत्त्वाचे.