२०२५ उत्तर अमेरिका चषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२५ उत्तर अमेरिका चषक ही उत्तर अमेरिका चषक क्रिकेट स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही क्रिकेट स्पर्धा १९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत केमन द्वीपसमूह येथे खेळवण्यात आली.

स्पर्धेत यजमान केमन द्वीपसमूह, तसेच बहामास, बर्म्युडा, कॅनडा आणि अमेरिका हे पाच संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेमुळे सहभागी संघांना २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळाली. अमेरिका या पात्रता स्पर्धेत सहभागी नव्हता, कारण त्याने यापूर्वीच २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.

अंतिम सामन्यात अमेरिकेने कॅनडाचा सहा गडी राखून पराभव केला आणि उत्तर अमेरिका चषकाचे पहिले विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →