२०२५ श्रीलंका महिला तिरंगी मालिका ही एप्रिल आणि मे २०२५ मध्ये श्रीलंकेत खेळवण्यात आलेली एक क्रिकेट मालिका होती. सादर मालिका ही भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांचा समावेश असलेली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्वरूपात खेळवले गेले. ही श्रीलंकेने आयोजित केलेली महिलांची पहिलीच आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका होती. ह्या मालिकेने २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक चषक स्पर्धेच्या पूर्वतयारीचे काम केले. सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुहेरी साखळी स्वरूपात खेळवण्यात आले.अंतिम सामन्यात, भारताने श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करून मालिका जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ श्रीलंका महिला तिरंगी मालिका
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.