२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धा ही एक क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा २०२६ महिला टी२० विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेचा भाग होती. स्पर्धेचा पहिला टप्पा असलेला द्वितीय विभाग २५ ते २९ मे २०२५ या कालावधीत इटली येथे खेळवण्यात आला. द्वितीय विभागात सहा संघ सहभागी झाले होते. यातील अव्वल दोन संघांनी २० ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नेदरलँड्स येथे झालेल्या प्रथम विभागात प्रवेश केला. आइल ऑफ मान महिला संघाने प्रथमच महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत भाग घेतला.
द्वितीय विभागातील जर्सी आणि स्वीडन यांच्यातील सामन्यात जर्सीच्या क्लोई ग्रीचन आणि स्वीडनच्या गया जयवीरा यांनी हॅट्ट्रिक घेतली. सर्व प्रकारांतील महिला आणि पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रतिस्पर्धी संघांच्या दोन गोलंदाजांनी एकाच सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याची ही पहिलीच घटना होती.
प्रथम विभागातील अव्वल दोन संघांनी २०२६ महिला टी२० विश्वचषक जागतिक पात्रता स्पर्धेत प्रवेश केला. आयर्लंड आणि नेदरलँड्स यांनी पात्रतेच्या दोन्ही जागा निश्चित केल्या.
२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.