२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती असेल. सदर स्पर्धा ही ३ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. परंतु, बांगलादेशमधील राजकीय अशांततेमुळे स्पर्धा त्याच वेळापत्रकानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली, तरीही यजमानपदाचे अधिकार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे ठेवण्यात आले. दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करत पहिले विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत यजमानांसह १० संघ सहभागी झाले होते. ज्यामध्ये २०२३ आवृत्तीतील अव्वल सहा संघ, आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारीमधील पुढील सर्वोच्च स्थानी असलेला संघ आणि जागतिक पात्रता फेरीद्वारे निर्धारित इतर दोन संघांचा समावेश होता. स्कॉटलंड प्रथमच महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत स्वीकारावा लागला. न्यू झीलंडने उपांत्य फेरीत वेस्ट इंडीज आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले.
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.