२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा २७ जुलै ते ६ ऑगस्ट २०२२ दरम्यान कॅनडामध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या अ गटातील ही दुसरी फेरी होती.

ऑक्टोबर २०१९ मध्ये आयसीसीने द्वितीय फेरीचे यजमानपद कॅनडाला दिले होते. नियोजनानुसार फेरी ऑगस्ट २०२१ मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →