२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेची ११०वी आवृत्ती होती. दरवर्षी प्रमाणे ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न येथे भरवण्यात आली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.

पुरुष एकेरीमधील गतविजेता नोव्हाक जोकोविच ह्याने कोव्हिड-१९ रोगाच्या साथीची प्रतिबंधक लस टोचून घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. महिलांमधील गतविजेती नाओमी ओसाका तिसऱ्या फेरीतच पराभूत झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →