२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट अ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट अचे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या अ गटात आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि श्रीलंका हे चार संघ होते. अ गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात पात्र ठरतील.

पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फर याने हॅट्रीक घेतली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हॅट्रीक घेणारा कर्टिस हा आयर्लंडचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. तसेच त्याने चौथ्या चेंडूवर देखील गडी बाद केला. त्यामुळे चार चेंडूत चार गडी बाद करणारा तो जगातला तिसरा क्रिकेट खेळाडू ठरला. चौथ्या सामन्यात आयर्लंडला हरवत श्रीलंकेने सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवला. आयर्लंड आणि नामिबियामध्ये करो वा मरो सामन्यात आश्चर्यकारकपणे नामिबियाने आयर्लंडवर थरारक विजय मिळवत सुपर १२ फेरीत प्रवेश मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →