२०१९ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा ३ ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत नेपाळमधील कीर्तिपूर येथे आयोजित करण्यात आली होती. पुरुषांच्या स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या २३ वर्षांखालील संघ आणि भूतान, मालदीव आणि नेपाळमधील वरिष्ठ संघांचा समावेश होता. त्यात भारत आणि पाकिस्तान सहभागी झाले नाहीत.
बांगलादेश संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव करून सुवर्णपदक जिंकले. तिसऱ्या स्थानासाठीच्या प्लेऑफमध्ये नेपाळने मालदीववर पाच गडी राखून मात करत कांस्यपदक जिंकले.
२०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?