२०१२ दिल्ली सामूहिक बलात्कार व हत्या

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०१२ दिल्ली सामूहिक बलात्कार व हत्या

दिनांक १६ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी ज्योती सिंग पांडे, या दिल्लीतील भौतिकोपचार (इंग्लिश: Physiotherapy ) शिकणाऱ्या मुलीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेरा दिवसांनी तिचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे तातडीचे उपचार करण्यासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून हलविण्यात आले होते.

ज्योती व तिचा मित्र दक्षिण दिल्लीमध्ये चित्रपट पाहून रात्री घरी परतत होते. सार्वजनिक बस समजून बाजूने जाणाऱ्या एका अनधिकृत बसमध्ये ते चढले. त्या बसमध्ये त्यांच्याशिवाय चालक व इतर पाच व्यक्ती, ज्यानां २० मार्च २०२०ला सकाळी ५.३०ला फाशी झाली. बसचालकाचे मित्र होते, हे प्रवास करत होते. बस योग्य दिशेने जात नसल्याचे कळल्यावर ज्योती व तिचा मित्राने त्याबद्दल विचाराले. मात्र त्यावर इतर प्रवाशांनी तिला व तिच्या मित्राला एका लोखंडी सळीने मारले व नंतर गाडीच्या मागच्या बाजूला तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व नंतर त्यांना जखमी अवस्थेत बसमधून फेकून दिले.

तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या हल्यात तिच्या लहान आतड्यांना इजा झाली होती व त्यामुळे ते काढून टाकावे लागले. २६ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी तिला पुढील उपचारासाठी सिंगापूरला हलविले गेले मात्र तिथे तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला.

या बलात्काराचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पडिसाद पडले. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला, यातील काही मोर्च्यांमध्ये सुरक्षा यंत्रणेवर हल्ले केले गेले. त्या सहाही जणांना हल्ला व बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे व त्यांच्यावर फास्ट ट्रॅक (इंग्लिश: Fast Track) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →