२०१० राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळांची १९वी आवृत्ती ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरवली गेली. अठरावा सोहळा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे २००६ मध्ये पार पडला होता. दिल्लीने यापूर्वी १९५१ आणि १९८२ मध्ये आशियाई क्रीडास्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. दिल्लीत आयोजित केला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बहुक्रीडा सोहळा होता. भारतात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा प्रथमच तर आशिया खंडात त्या होण्याची ही दुसरी वेळ होती.
नोव्हेंबर २००३ मध्ये राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा महासंघाच्या जमैकामध्ये झालेल्या बैठकीत २०१० च्या क्रीडास्पर्धा भारतात घेण्याला मतदानाने मंजूरी देण्यात आली. यात कॅनडामधील हॅमिल्टन हे दिल्लीला एकमेव स्पर्धक शहर होते.
२०१० राष्ट्रकुल खेळ
या विषयातील रहस्ये उलगडा.