२००९ डकार रॅली ही डकार रॅलीची ३०वी शर्यत आहे. ही शर्यत कार, मोटरसायकल व ऑल टरेन वाहनांना खुली असते. आर्जेन्टिना व चिलीमध्ये होणारी ही शर्यत जानेवारी ३, इ.स. २००९ रोजी सकाळी ५ वाजता (आर्जेन्टिना प्रमाणवेळ, ७:०० यु.टी.सी.) सुरू झाली. यावर्षीची शर्यत पहिल्यांदाच युरोप वा आफ्रिकेबाहेर होत आहे. याचे मुख्य कारण दहशतवाद आहे. २००८ची शर्यत याच कारणामुळे रद्द करण्यात आली होती.
फेब्रुवारी २००८मध्ये या नवीन ठिकाणांबद्दल सूतोवाच करताना शर्यत निदेशक एटियें लव्हिनने सांगितले होते की डकार स्पर्धकांना पुढील वर्षी वेगळा भूभाग, वेगळी दृष्ये दिसतील.
२००९ डकार रॅली
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.