१९९६-९७ स्टँडर्ड बँक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

स्टँडर्ड बँक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका हे दक्षिण आफ्रिकेतील १९९६-९७ हंगामातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे नाव होते. ही दक्षिण आफ्रिका, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती.

दक्षिण आफ्रिकेने सलग सहा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील शेवटच्या साखळी सामन्यात दुस-या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. भारताला झिम्बाब्वेचा पराभव करून गुणांची बरोबरी करावी लागली. निव्वळ धावगतीच्या आधारावर अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना झिम्बाब्वेने दिलेले लक्ष्य ४०.५ षटकांत गाठणे आवश्यक होते. भारताने ४० षटकांच्या आत लक्ष्याचा पाठलाग केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात करत ट्रॉफी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →