१९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला, त्याला लातूरचा भूकंप म्हणले जाते. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्ध्वस्त झाली. भूकंप आणि आरएसएस
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९३ लातूर भूकंप
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.