२४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर १९३६ उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत बेसबॉल या खेळाचा पुन्हा एकदा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला होता. यानंतर तब्बल ५६ वर्षांनी १९९२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत बेसबॉलला अधिकृत खेळाचा दर्जा मिळाला. बर्लिन येथील या सामन्यात खेळलेले दोन्ही संघ अमेरिकेचे होते.
हा प्रात्यक्षिक सामना १२ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिन येथील ऑलिंपिक स्टेडियममध्ये ९०,००० प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला गेला. या संघांना वर्ल्ड चॅम्पियन्स आणि यु.एस. ऑलिंपिक्स अशी नावे देण्यात आली होती. या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन्स संघाने ६-५ असा विजय मिळवला.
ऑलिंपिक खेळात बेसबॉलचा समावेश करण्यासाठी जोरदार पाठपुरावा करणारे लेस्ली मान यांनी या सामन्यात पंचांची भूमिका बजावली होती.
१९३६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बेसबॉल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.