होलोकॉस्ट (ग्रीकः ὁλόκαυστος होलोकाउस्तोस ; शब्दाची फोड: hólos, "संपूर्ण " आणि kaustós, "भाजणे") हे नाव दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीकडून करण्यात आलेल्या ज्यू लोकांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी दोन तृतीयांश (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत ज्यूविरोधाची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी अॅडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची योजना आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये (इंग्लिश: Concentration camps) डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारुण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. डखाउ, बुखनवाल्ड, आउश्वित्झ ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने पूर्व युरोपातील देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.
१९४२ साली ज्यूंच्या सामूहिक कत्तलीसाठी संहारछावण्याउभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.
होलोकॉस्ट
या विषयातील रहस्ये उलगडा.