होन्झोन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

होन्झोन

होन्झोन (本尊), याला कधी कधी गोहोनझोन म्हणून देखील ओळखले जाते. हे जपानी बौद्ध धर्माची मुख्य देवस्थान किंवा मुख्य देवता आहे बुद्ध, बोधिसत्त्व किंवा मंडळची प्रतिमा मंदिरात किंवा घरगुती बुट्सुदनमध्ये स्थित असते.

प्रतिमा म्हणजे एकतर पुतळा किंवा छोटीसी कागदाची किंवा चर्मपत्राची गुंडाळी असू शकते. ही गोष्ट पंथाप्रमाणे भिन्न भिन्न बदलते. प्रतिमा एकल प्रतिमा किंवा प्रतिमांचा समूह असू शकतो. होन्झोन प्रतिमा मंदिरातील मुख्य (होन्डू) हॉल किंवा खजिन्याचा (कोन्डू) हॉल मध्ये असते. त्याची उपस्थिती विशिष्ट हॉल किंवा संपूर्ण मंदिरासाठी असते. कधी कधी होन्झोन ही केंद्रीय प्रतिमा (जिला चुस्सॉन म्हणतात) ही तीन (सॅनझॉनबुटु) किंवा पाच (गोसॉन) प्रतिमांचा समूह असते.

मुर्तीच्या निर्मितीनंतर अभिषेक सोहळा होतो, ज्याला कैजेन म्हणतात. कैजेनच शब्दशः अर्थ 'डोळे उघडणे' असा होतोत्. असे मानले जाते की कैजेन नंतर होन्झोन हे पात्रामध्ये रूपांतरित करते ज्यात पवित्र शक्ती वास करू शकते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →