हेन्रिक इब्सेन (जन्म : २० मार्च १८२८ - २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. एकप्रवेशी, एकअंकी नाटकांची सुरुवात इब्सेनने केली. कथानकांतील व्यक्ती आणि कुटुंबे यांचा भोवतालच्या सांस्कृतिक जीवनातल्या नीतिमूल्यांच्या संदर्भात घेतलेल्या धांडोळ्यामुळे इब्सेनची नाटके अधिकच वास्तवदर्शी झाली आहेत.
इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत.
'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
हेन्रिक इब्सेन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?