हेडविग एलिझाबेथ शार्लोट

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

हेडविग एलिझाबेथ शार्लोट

होलस्टीन-गोटॉर्पची हेडविग एलिझाबेथ शार्लोट (स्वीडिश: Hedvig Elisabet Charlotta; २२ मार्च, १७५९ - २० जून, १८१८) ही स्वीडनचा राजा चार्ल्स तेरावा (नॉर्वेचा दुसरा चार्ल्स) याची राणी होती. ती आपली रोजनिशी लिहीत असे. याशिवाय तिने अनेक संस्मरणे लिहिली होती आणि देशातील विदुषींपैकी एक होते.



तिचा जन्म ओयटिन येथे होलस्टीन-गोटॉर्पचा ड्युक फ्रेडरिक ऑगस्ट पहिला आणि हेसे-कॅसलची राजकुमारी उल्रिके फ्रिडेरिका विल्हेल्मिने यांच्या घरी झाला. तिचे बालपण ओयटिनमध्ये गेले आणि ७ जुलै १७७४ रोजी वयाच्या पंधराव्या वर्षी स्टॉकहोममध्ये तिचे लग्न तिचा मावस भाऊ सोडरमॅनलँडचा ड्युक चार्ल्स याच्याशी झाला. स्वीडनच्या सिंहासनाला वारस मिळावा या उद्देशाने राजा गुस्ताव तिसरा याने हे लग्न ठरवून दिले होते. गुस्तावचे लग्न झाले असले तरी त्याने आपल्या राणीशी संबंध ठेवले नव्हते व आपला वंश त्याने भावाद्वारे पुढे नेण्याचे ठरवले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →