हिब्रू भाषा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हिब्रू भाषा

हिब्रू ही सामी भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा व इस्रायल देशाची सह-राष्ट्रभाषा (अरबीसह) आहे. हिब्रू जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून ती ज्यू धर्मामधील सर्वात महत्त्वाची भाषा मानली जाते. तोराह हा ज्यूंचा धर्मग्रंथ तसेच हिब्रू बायबल प्राचीन हिब्रूमध्ये लिहिले गेले आहे.

प्रागैतिहासिक काळापासून वापरात असलेल्या हिब्रूचा इ.स. २०० ते इ.स. ४०० दरम्यान काहीसा ऱ्हास झाला होता. ह्या काळात ज्यू व्यक्ती हिब्रूऐवजी ॲरेमाईक अथवा ग्रीक भाषांचा वापर करीत असत. मध्य युग काळामध्ये हिब्रू लुप्त होण्यापासून बचावली व १९व्या शतकामध्ये हिब्रूची पुन्हा वाढ होऊ लागली. सध्या जगभरात सुमारे ९० लाख हिब्रू भषिक आहेत ज्यांपैकी ७० लाख इस्रायलमध्ये आहेत. अमेरिका देशामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हिब्रू भाषिक वसले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →