हिपीहापा मेट्रो स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हिपीहापा मेट्रो स्थानक

हिपीहापा हे इक्वेडोरच्या कितो शहरातील कितो मेट्रोवरील एक स्थानक आहे. २१ डिसेंबर २०२२ रोजी कितुंबे आणि एल लाब्रादोर दरम्यानच्या मार्गाच्या उद्घाटन झाल्यावर हे स्थानक अधिकृतपणे उघडण्यात आले. महसूल सेवा २ मे २०२३ रोजी सुरू झाली आणि ११ मे २०२३ रोजी बंद झाली.ही सेवा १ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुरू झाली. हे स्थानक एल लाब्रादोर आणि इञाकितो या स्थानकांमध्ये आहे.

हे भूमिगत स्टेशन आहे आणि इथली प्रवाशांची संख्या अंदाजे रोजी ५३,००० इतकी आहे. हे स्थानक अपंगांसाठी सोयीचे आहे आणि यात एस्केलेटर उपलब्ध आहेत. हे स्थानक निळ्या रंगाचे रंगवले आहे.

हे स्थानक प्लाझा डे तोरोस च्या शेजारी आव्हेनिदा आमाझोनास, आव्हेनिदा हुआन दे आस्काराय आणि आव्हेनिदा तोमास दे बेरलांगाच्या चौकात आहे.

या स्थानकाचे बांधकाम ३१ मार्च २०२१ रोजी पूर्ण झाले, त्यानंतर स्थानकाला शहराकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होऊन २ मे २०२१ रोजी पूर्ण झाली. २३ जानेवारी २०२३ रोजी ६०० आमंत्रित प्रवाशांसह पहिली गाडी स्थानकावर आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →