ला आलामेदा हे इक्वेडोरच्या कितो शहरातील कितो मेट्रोवरील एक स्थानक आहे. २१ डिसेंबर २०२२ रोजी कितुंबे आणि एल लाब्रादोर दरम्यानच्या मार्गाच्या उद्घाटन झाल्यावर हे स्थानक अधिकृतपणे उघडण्यात आले. महसूल सेवा २ मे २०२३ रोजी सुरू झाली आणि ११ मे २०२३ रोजी बंद झाली. ही सेवा १ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुरू झाली. हे स्थानक एल एहीदो आणि सान फ्रान्सिस्को दरम्यान आहे.
हे भूमिगत स्थानक ला आलामेदा उद्यानाच्या शेजारी, आव्हेनिदा १२ दे ओक्तूब्रेच्या खाली आहे.
२७ ऑगस्ट २०१८ रोजी मार्गाच्या बोगद्याचे काम स्थानकापर्यंत वाढवण्यात आले. २३ जानेवारी २०२३ रोजी ६०० आमंत्रित प्रवाशांसह पहिली गाडी स्थानकावर आली.
ला आलामेदा मेट्रो स्थानक (कितो)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.