हिना हा १९९१ चा भारतीय प्रणय नाट्य चित्रपट आहे, जो ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिलेला आहे आणि रणधीर कपूर यांनी निर्मित व दिग्दर्शित केला आहे. यात ऋषी कपूर, पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार आणि अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची योजना आणि सुरुवात दिग्दर्शक राज कपूर यांनी केली होती, परंतु चित्रीकरणापूर्वीच त्यांचे निधन झाल्यामुळे ह्याचे चित्रीकरण त्यांच्या मोठ्या मुलाने रणधीरने केले. चित्रपटाचे संवाद पाकिस्तानी लेखिका हसीना मोइन यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट समीक्षात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाच्या अकादमी पुरस्कारासाठी भारताचा उमेदवार होता, परंतु तो नामांकित म्हणून स्वीकारला गेला नाही.
चित्रपटाचा काश्मीर भाग हा हिमाचल प्रदेशातील मनाली येथे चित्रित करण्यात आला आहे. काही भागांचे चित्रीकरण पाकिस्तान (मुरी, इस्लामाबाद), स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये झाले.
हिना (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.