प्रेम रोग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्रेम रोग हा १९८२ चा हिंदी भाषेतील संगीतमय रोमँटिक नाट्यपट आहे जो राज कपूर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे, ज्याची पटकथा जैनेंद्र जैन आणि कामना चंद्रा यांनी लिहिली आहे. हा चित्रपट एका पुरूषाच्या (ऋषी कपूर) एका उच्च दर्जातील परावाराच्या विधवा (पद्मिनी कोल्हापुरे) स्त्रीवरील प्रेमाची कहाणी सांगतो. या चित्रपटाने राज कपूरचे सामाजिक विषयांवर पुनरागमन घडवले.

३० जुलै १९८२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षी सुभाष घई यांच्या विधाता (कोल्हापुरे आणि शम्मी कपूर यांच्या भूमिका) नंतर बॉक्स ऑफिसवर दुसरे स्थान पटकावले.

३० व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता (ऋषी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (नंदा) आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (लक्ष्मीकांत-प्यारेलाल) यासह १२ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (कपूर) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कोल्हापुरे) यासह ४ पुरस्कार जिंकले.

गेल्या काही वर्षांत, प्रेम रोगने कल्ट-स्टेटस मिळवला आहे आणि राज कपूर, ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सर्वोत्तम कामांपैकी एक मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →