हिदाल्गो काउंटी ( ;es ) अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,७०,७८१ इतकी होती. ही काउंटी टेक्सासमधील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आणि टेक्सास त्रिकोनाबाहेरील सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र एडिनबर्ग येथे आहे तर सर्वात मोठे शहर मॅकअॅलेन आहे.
हिदाल्गो काउंटीची रचना १४ जानेवारी, १८५२ रोजी झाली. या काउंटीला स्पेनपासून मेक्सिकोला स्वातंत्र्य मिळण्याची हाक देणाऱ्या धर्मगुरू मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाचे नाव दिलेले आहे. दक्षिण टेक्सासच्या रिओ ग्रांद खोऱ्यातीलही काउंटी अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या काउंटींपैकी एक आहे. हिदाल्गो काउंटी मॅकअॅलेन-एडिनबर्ग-मिशन महानगराचा भाग आहे.
२०२० मध्ये येथील लोकसंख्येचे ९१.९% लोक हिस्पॅनिक होते. ही काउंटी टेक्सासमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेली हिस्पॅनिक-बहुसंख्य काउंटी होती.
२०२० मध्ये हिदाल्गो काउंटीतील उत्पादनांची एकूण किंमत $११.५ अब्ज होती.
हिदाल्गो काउंटी (टेक्सास)
थोडक्यात पण महत्त्वाचे.