हिज स्टोरी ही प्रशांत भागिया दिग्दर्शित एक भारतीय, हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य वेब सिरीज आहे. ही अल्टबालाजी आणि झी५ ची मूळ मालिका आहे, जी २५ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित झाली. यात सत्यदीप मिश्रा, प्रियामणी राज आणि मृणाल दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका तनवीर बुकवाला आणि डिंग एंटरटेनमेंट यांनी निर्मित केली आहे आणि ती सुपरन वर्मा आणि रितू भाटिया यांनी लिहिली आहे. ही मालिका साक्षी (प्रियामणी), तिचा नवरा कुणाल (मिश्रा) आणि त्याचा प्रियकर प्रीत (दत्त) यांच्या आयुष्याभोवती फिरते आणि समाज आणि कुटुंबाकडून समलैंगिकांना स्वीकारण्याच्या सामाजिक मुद्द्याभोवती आहे.
मालिकेत ८ भाग आहे, व प्रत्येक भाग हा २२-२५ मिनीटांचा आहे.
हिज स्टोरी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?