हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. इ.स. १६३६ साली स्थापन झालेले हार्वर्ड हे अमेरिकेमधील सर्व चार्ल्स एलियट ह्याच्या अथक प्रयत्नांमुळे हार्वर्ड जगातील सर्वोत्तम संशोधन शैक्षणिक संस्था बनली. सुमारे ३२.३ अब्ज डॉलर संपत्ती असलेले हार्वर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. आयव्ही लीग ह्या न्यू इंग्लंड परिसरातील प्रतिष्ठेच्या विद्यापीठ समूहाचा हार्वर्ड सदस्य आहे.
हार्वर्ड विद्यापीठ बॉस्टन शहराच्या ३ मैल वायव्येस चार्ल्स नदीच्या काठावर २०९ एकर जागेवर स्थित आहे. आजवर ८ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी येथून शिक्षण घेतले आहे तसेच सुमारे १५० नोबेल पारितोषिक विजेते हार्वर्डसोबत जोडले आहेत.
हार्वर्ड विद्यापीठ
यामागील विज्ञान आणि इतिहास.