हवाई हे अमेरिकेच्या ५०पैकी एक राज्य आहे. अमेरिकेच्या राज्यांपैकी हे एकमेव राज्य उत्तर अमेरिका खंडाच्या भूभागाशी जोडलेले नाही. हवाई प्रशांत महासागरामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला, जपानच्या आग्नेयेला व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला पॉलिनेशिया उपखंडात मोठ्या द्वीपसमूहावर वसले आहे. हवाई हे अमेरिकेचे ५०वे व सर्वात नवे राज्य आहे.१८९८पूर्वी हवाई हा स्वतंत्र देश होता.१८९८ सालापासून अमेरिकेचा भूभाग असलेल्या हवाईला २५ ऑगस्ट १९५९ रोजी राज्याचा दर्जा देण्यात आला.
प्रशांत महासागरात १,५०० मैल पट्ट्यात पसरलेल्या हवाई द्वीपसमूहामधील हवाई, नीहाऊ, काऊई, ओहाऊ, मोलोकाई, लानाई, काहूलावी व माऊई ही आठ प्रमुख बेटे आहेत.
हवाई
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?