डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर (जन्म : ११ आॅक्टोबर १९४४) हे एक मराठी कोशकार आहेत. ते एम.ए.पीएच.डी आहेत. 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' हा त्यांच्या पी.एच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. कोशांव्यतिरिक्त काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली असली तरी झाडीबोली भाषेचा कोश आणि मराठी अंत्याक्षरी कोश ह्या दोन कोशांमुळे हरिश्चंद्र बोरकर प्रकर्षाने ओळखले जातात. हरिश्चंद्र बोरकरांचे २०१८ सालापर्यंत १३ कवितासंग्रह, १४ कादंबऱ्या/कथासंग्रह, १६ नाटके, २ प्रवासवर्णने, १४ समीक्षा ग्रंथ आणि तीन शब्दकोश प्रकाशित झाले आहेत.[१] Archived 2018-10-08 at the वेबॅक मशीन.
'दंडार', 'खडीगंमत' या लोककलांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे.
हरिश्चंद्र बोरकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.