हरिपाठ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हा लेख ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनापुरता मर्यागित आहे. हरिपाठांचे आणि इतरही कॉपीराईट फ्री मूळ लेखन हे मराठी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन केले जाते. ज्यांना मूळ ग्रंथांचे स्रोत बघायचे असतील, लेखन- वाचन करावयाचे आहे त्यांना मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:हरिपाठ येथे करता येईल.

हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.

हरिपाठाचा शब्दशः अर्थ हरीचा पाठ, हरीचे नामस्मरण पण तार्किकदृष्ट्या विचार केला तर हरिपाठ म्हणजे हरीला (विठ्ठलाला) प्राप्त करून देणारे तत्त्वज्ञान.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →