हरितसेना

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हरितसेना महाराष्ट्राची ओळख: भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्तवातील कलम 48 अ नुसार वन, वन्यजीव, पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधंनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय कलम 51अ(ग) अन्वये वन, वन्यजीव, नदी, तलाव या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच प्राणिमात्राबाबत आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण 20% असल्याने लक्षणीय वाढ करणे प्रकरणी येणाऱ्या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्याकरिता अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदर्हु महाराष्ट्र हरित सेनेत समाजातील सर्व स्तरातील घटक जोडणे गरजेचे असून त्याकरिता ऑनलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे, जेणेकरून लोकसहभाग व सहयोग घेणे सुनिश्चित करता येईल.

उद्दिष्टे

वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टी ने जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढीच माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजांपर्यंत विविधांगांनी वने ही माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. त्या‍मुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्हीं गोष्टीस महत्त्वाच्या असल्याने त्यादृष्टी.ने विभागाने कामाची दिशा ठरविली आहे. वने ही माणसाला मिळालेली एक नैसर्गिक संपदा आहे. वनांचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक आहे उत्तम वन व्यवस्थापन. वने ही प्रामुख्याने जमीन, वनस्पती, झाडे, प्राणी, सुक्ष्म जीवजंतू यांनी बनलेली असतात. वनातील हे घटक एकमेकांना पूरक स्वरूपाचे काम करतात. त्यामुळे सजीवसृष्टी.चा समातेल राखण्यास मदत होते. यापैकी कुठल्याही एका घटकात बदल झाला तर पर्यावरणाची साखळी विस्कळीत होते.



राष्ट्रीय व राज्य वन धोरणानुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वृक्षाच्छादित असणे गरजेचे आहे.

त्याच प्रमाणे भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४८ अ नुसार वन्यजीव पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यावर सोपवण्यात आली आहे.

प्रत्येक नागरिकास वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देणे.

लोकसहभागातुन वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करणे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →