दुसरा इस्तव्हान तथा दुसरा स्टीवन (हंगेरियन: II. István; ११०१ – १ मार्च, ११३१) हा हंगेरी आणि क्रोएशियाचा राजा होता. त्याने इ.स. १११६ ते इ.स. ११३१ या काळात राज्य केले. तो आर्पाड राजवंशाचा सदस्य होता. त्याचे वडील राजा कोलोमनच्या मृत्यूनंतर तो सिंहासनावर बसला. त्याच्या कारकीर्दीचा बहुतांश काळ शेजारील राष्ट्रांशी, विशेषतः बायझेटाईन साम्राज्य आणि व्हेनिस प्रजासत्ताकासोबत झालेल्या युद्धांनी व्यापलेला होता.इस्तव्हानच्या सत्ताकालात हंगेरीने डाल्मेशियाच्या नियंत्रणासाठी व्हेनिस प्रजासत्ताकासोबत प्रदीर्घ संघर्ष केला.
त्याचे वडील कोलोमनने इस्तव्हानला त्याच्या लहानपणीच आपला वारसदार म्हणून घोषित केले होते. त्याच्या राज्याभिषेकानंतर लगेचच ऑस्ट्रियाशी युद्ध झाले, ज्यात हंगेरीचा पराभव झाला.
इस्तव्हानला स्वतःचा मुलगा नसल्यामुळे, त्याने आपला चुलत भाऊ बेला याला आपला वारसदार म्हणून नियुक्त केले होते. इस्तव्हानचे वडील कोलोमननी बेलाचा छळ करून त्याचे डोळे काढून घेतले होते.
१ मार्च, ११३१ रोजी इस्तव्हानचा मृत्यू झाला. त्याला ओराडिया येथील कॅथेड्रलमध्ये दफन करण्यात आले.
हंगेरीचा दुसरा इस्तव्हान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!