स्पेसएक्स

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

स्पेसएक्स

स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कार्पोरेशन ही एक खाजगी अमेरिकन एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ परिवहन सेवा कंपनी आहे, जी स्पेसएक्स (SpaceX) या संक्षिप्त नावाने व्यवहार करते. या कंपनीचे मुख्यालय हॉथॉर्न, कॅलिफोर्निया इथे आहे. उद्योजक एलॉन मस्क यांनी अंतराळ परिवहनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि मंगळावर मानवी वसाहत सुरू करण्यासाठी २००२ साली या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून स्पेसएक्सने फाल्कन रॉकेट परिवार आणि ड्रॅगन अंतराळ यान परिवार विकसित केले आहेत जे सध्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये पेलोड वितरित करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →